क्षणा क्षणात येणाऱ्या क्षणांचा काही क्षणात विचार कर
मना मनातल्या चांगल्या मनांचा मनापासून विचार कर
जनातले कि मनातले हि दुविधा कशासाठी
जणांसाठी कि मनासाठी हि दुविधा कशासाठी
काही क्षणात कोणी तरी मनात येते
तर काही मनांना क्षणही पुरत नाहीत
काही क्षण अद्भुत असे
काही क्षण अद्वितीय
काही क्षण अप्रतिम
तर काही क्षण अगदीच क्षुल्लक
मनाचेही काहीसे तसेच
पण मनापासून ओळख
खऱ्या मनाची मनापासून तूच कर पारख
कलुषित मानांपासून मात्र नेहमीच राहा सावध
चांगले वाईट तूच ठरव
तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार
सद संगती आणि दुष्टांना दूर ठेव
त्यानेच मिळेल आयुष्याला तुझ्या आकार
क्षणात पाहिलेली स्वप्ने असतात खूप साजरी
मनापासून करशील तर नक्कीच होतील साकार
क्षणा क्षणाने मनाची तू मनाशी सांगड लाव
एका क्षणात एक तरी मन जिंकण्याची तू मनाशीच पैज लाव
सुख दुखः असते मित्रा भलतेच क्षणभंगुर
क्षणा क्षणात जागून बघ आयुष्य किती हे सुंदर !!!
1 comment:
Manachi ani khsanachi sangad tari kashi lagnar..
manachi duvidha vayala kshan tari kiti lagnar?
Manachi parakh tar parkhichi karnar..
Gar takun hiryala Joharich Olakhnar...
Mitra--- Manala theun kabut kshanat jagaycha asta
Kshan-manachya jodinech swapna sakaraych asta.....
Post a Comment