Tuesday, December 13, 2016

स्पंदने मनाची..!!! 


स्पंदने मनाची कसा ठाव घेती
भावना तयाच्या  मर्मबंध जपती
रिक्त वाटे सार्‍या रीतीभाती
प्रेमाच्या आशेने जळणारी नाती
रागलोभ प्रेमप्रीत वासना त्या किती
सप्तरंगी नाहण्या ओंजळ करती
स्पंदने मनाची रुणझुण करती
भिरभिरत्या पाखरांसम किलबिल करती
अंतरंग निर्मळ परी तेजोमय कांती
मत्सर मिसळून तया गढूळ त्या होती
स्पंदने मनाची किती आक्रोश करती
मनुधर्म सोडण्याची वाटते भिती
सद्बुद्धी आतल्या जाग्रुत होती
विचारांच्या वादळात लवलवती पणती
स्पंदने मनाची अनुभवे क्रांती
द्वंद्व  अंतर्मनातले अवती नि  भोवती
स्पंदने मनाची कसा ठाव घेती
दुर्विचारांच्या किती अंतर्गत मौती
जगण्याच्या रोज नव्या अनुभूती
स्पंदने मनाची.....