Wednesday, April 6, 2011

ना जाने कैसी ही ये जिन्दगानी ....||

 हि  कविता माझ्या एका जुन्या पोस्टचा भाग होती....आज इतक्या वर्षांनंतर पूर्ण करायचा प्रयत्न करतोय ....


क्षणात  आपले  असते  कोणी ....
क्षणात  नसे  कोणी ....
क्षणात  गातो  आपण  गाणी ....
क्षणात  डोळ्यात  पाणी ...
क्षणात  बसते  ,क्षणात  उठते ,
क्षणात  कितीतरी  आठवणी ...
क्षणा  क्षणात  बदलते  वाणी ...
ना  जाने  कैसी  ही  ये  जिन्दगानी ... ||
जीवनाच्या खेळातला मीच खरा राजा
छोट्याशा गोष्टीचा देखील करतो गाजा वाजा
आठवणींच्या  साम्राज्यामध्ये जखमा ताज्या ताज्या
लाजिरवाण्या असो किवा स्वाभिमानाच्या माझ्या
सुख्दुक्खाच्या धाग्यांनी गुंफलेल्या आठवणी
सुन्न करून टाकतात या आपणाला अंतर्मनी
सुज्ञ अशा त्या जणू आकाशवाणी
ना  जाने  कैसी  ही  ये  जिन्दगानी ... ||
भितींच्या अंधाऱ्या राज्यात  कोण कुठला राजा
सर्वच राजांचा येथे वाजतो band बाजा
आयुष्याचा खेळ आहे हा नाही गम्मत गाणी
ना जाने कैसी ही ये जिन्दगानी ....||







Tuesday, April 5, 2011

क्षणात !!!!

क्षणा  क्षणात येणाऱ्या क्षणांचा काही क्षणात विचार कर 
मना मनातल्या चांगल्या मनांचा मनापासून विचार कर 
जनातले कि मनातले हि दुविधा कशासाठी 
जणांसाठी कि  मनासाठी हि दुविधा कशासाठी 
काही  क्षणात कोणी तरी मनात येते 
तर काही मनांना क्षणही पुरत नाहीत 
काही क्षण अद्भुत असे 
काही क्षण अद्वितीय 
काही  क्षण अप्रतिम 
तर काही क्षण अगदीच क्षुल्लक
मनाचेही काहीसे तसेच 
पण मनापासून ओळख
खऱ्या मनाची मनापासून तूच कर पारख 
कलुषित  मानांपासून मात्र नेहमीच राहा सावध
चांगले  वाईट  तूच ठरव
तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार 
सद संगती आणि दुष्टांना दूर ठेव 
त्यानेच  मिळेल  आयुष्याला तुझ्या आकार 
क्षणात पाहिलेली स्वप्ने असतात खूप साजरी 
मनापासून करशील तर नक्कीच होतील साकार 
 क्षणा क्षणाने मनाची तू मनाशी सांगड लाव 
 एका क्षणात एक तरी मन जिंकण्याची तू मनाशीच पैज लाव
 सुख दुखः असते मित्रा भलतेच क्षणभंगुर 
 क्षणा क्षणात जागून बघ आयुष्य किती हे सुंदर !!!