Tuesday, April 7, 2020

मेंदूला कोरोना झाल्यासारखं वाटतंय !!!

रम्य अशा सकाळी प्रदूषण कमी वाटतंय
घरीच असून देखील वातावरण भीषण वाटतंय
आयुष्यभर ज्या घरासाठी किंवा घरच्यांसाठी वणवण काम करतोय
आज त्यांच्याच बरोबर वेळ घालवण लोकांना का बर अवघड वाटतंय
मेंदूला कोरोना झाल्यासारखं वाटतंय....
कसे त्यांना समजाऊन सांगावे
कसे त्यांच्या डोक्यात घुसवावे
हे सगळं त्यांच्यासाठीच सांगितलं आहे
कसे त्यांच्या मनात ठसवावे
भाजीपाल्याच्या मार्केट मधली गर्दी
A.C. मुळे झालेली सर्दी
डॉक्टर आणि पोलिसांसाठी जागवलेली मनातली हमदरदी
तर कुठे कुठे त्यांच्याविरोधात केलेली गुंडागर्दी
सगळच कसं सुन्न करून टाकतय
मेंदूला कोरोना झाल्यासारखं वाटतंय.....
सगळ्या देवांची दारे बंद
पण समजायला तयार नाहीत काही मंद
श्रद्धेला अंधश्रद्धेची जोड नको
उगाच नमाजीची ओढ नको
संसर्गाचया या साथी मध्ये जातीचे या व्यंग नको
अशा वेळी लढावयला हिंदू मुस्लिम रंग नको
मौलानाच्याच बेताल वाक्यांचा अतिरेक झाल्यासारखं वाटतंय
मेंदूला कोरोना झाल्यासारखं वाटतंय....
काय करावे कसे हसावे कसे रडावे कसे जगावे
प्रश्न असे अनेक प्रत्येक जीवाला पडतायेत
थिजत थिजत आयुष्य हे जगतायेत
दूध किराणा आनायला सुध्धा बाहेर पडवस वाटतंय
घरी बसायचं माहीत असूनसुद्धा मन बाहेरच रमतय
नैतिकतेने अनैतिकतेची साथ दिल्यासारखे वाटतंय
मेंदूला कोरोना झाल्यासारखं वाटतंय....

- रावसाहेब

Sunday, November 3, 2019

मधली सुट्टी !!!

This poem was written for return gift of our school get together called madhali sutti

आठवणींच्या शाळेची भरता मधली सुट्टी
जीव्हाळ्याची ऊब साठवून ओठी-पोटी
घेऊन परत भेटण्याची आश्वासने खरी-खोटी
अलगद ओघळलेली आसवे छोटी छोटी
खोट्या हास्यासहीत राम राम ओठी
सदैव स्मरणात राहो आपल्या ही
मधली सुट्टी
आयुष्याची मधली सुट्टी

Friday, October 18, 2019

मैत्र जीवांचे!!!

मैत्र जीवांचे!!!

आयुष्यातल्या वाटेवरचा सर्वात पहिला टप्पा.. जो खरेतर त्या वेळी खूपच खडतर वाटायचा.. पण प्रत्यक्षात आज मागे वळून पाहाताना लक्षात येतय की आपल्या जडन घडणासाठी सर्वात पूरक होता. तो टप्पा म्हणजे आपल्या लहानपनीचा आपल्या शाळेचा. अनेकदा मनात विचार येतो, तसेच बर्‍याचदा बोलता बोलता विषय निघतो की एवढ शिकून सवरुन काय उपयोग आणि तेव्हा त्या चर्चेचा किवा वादाचा रुपांतर आपणास त्या काळात घेऊन जात. खरच कसा होता तो काळ. तेव्हाची किमयाच वेगळी होती. तेव्हा शाळेत आपली जडनघडण घडली हे जितके खरे तितकाच त्या शाळेत असणार्‍या प्रत्येक मित्राचाही वाटा त्यात तितकाच. मला असे वाटते की आयुष्यातली सर्वात निखळ आणि निस्वार्थ मैत्री ही फक्त शाळेतली मैत्री, कारण त्या मैत्री मधे ना कसला स्वार्थ ना कधी जातपात मध्ये येते ना कोणत्या पक्षाचा राजकारण असते ती फक्त मनाची जोडलेली तार प्रेम आणि निस्सीम मैत्रभाव. आणि सोप्या भाषेत सांगायचे तर तेच आहेत आपले खरे मैत्र जीवांचे!! कदाचित माझ्या या बोलण्याला अपवाद देखील असु शकतात पण माझा तरी हा वैयक्तिक अनुभव आहे.

तर विषय शाळेवर आलेलाच आहे तर शाळेच्या दोन आठवणी देखील मांडावयाशा वाटतात. माझी शाळा सॉरी आपली शाळा- जुनी सोसाइटी हाइस्कूल किवा आपल्या परिचयाची अहमदनगर एजुकेशन सोसायटीची भाउसाहेब फिरोदिया हायस्कूल हिच्याबद्दल मला नाही वाटत आख्या नगर शहराला काही सांगायची गरज नाही पण तेव्हाची शाळा तेव्हाचे शिक्षक खरच अप्रतिम होते. आजकालच्या शिक्षण पद्धतीत तशी मजा नाही राहिली. आपल्या वेळेस शाळेमधे शालेय पुस्तकि शिक्षणबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर देखील तितकीच मेहनत घेतली जात होती. मग ते बासकेट बॉल असो, कबड्डी,खोखो,गोळाफेक,थालीफेक,इत्यादीचे आंतरवर्गीय सामने असो, आंतरशालेय खेळाच्या स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा, गायन, वादन , सांस्कृतिक कार्यक्रम, कला, नाट्य, एकही क्षेत्र नव्हता ज्यामधे आपल्या शाळेतील आपल्यतील बरेच विद्यार्थी सदैव पुढे राहिलेत. एकूणच काय तर सर्वांगीण विकासावर त्यावेळी भर दिला जायचा. मला आठवतय लहानपणी सामुहगायनात देखील चांदनपुरकर बाईंनी माझ्यासारख्याकडून गायन करून घेतलय. अर्थात यात बाईंच्या डेरिंग्ची खरच दाद दिली पाहिजे. असो तेव्हा आम्ही लेझीम खेळायचो, दिंडी मधे सुधा भाग घ्यायचो... शाळेचे ते दिवस म्हणजे खरच अवर्णनीय. अरेच्या बोलता बोलता त्या सगळ्या आठवनीचे धूसर पडसाद मनावर पडायला लागलेत. नुसता विचार करूनच मन एकदम प्रसन्न होतेय. त्या सगळ्या आठवणीच्या वेगवेगळ्या छटांच जणू वलयच तयार व्हायला लागलाय विचरांभोवती. आठवतय शाळेच्या मधल्या सुट्टीत तसेच शाळा सुटल्यावर पॅडआणि प्लास्टिक सनच्या बॉलने क्रिकेट खेळायचो. त्यावेळेस व्यास, धन्या, मगर्या, सुंब्या, फिर्‍या, नित्या, हेम्म्या, तडड्या, भेल्या, दार्या, सुशा, (ही सगळी आमची शाळेतली नाव होती आता कदाचित काहींना त्या नावाने इथे असे सम्बोधल्यास कदाचित आवडणार पण नाही ) आम्ही सगळे तहान भूक सगळा विसरून क्रिकेट खेळायचो. किवा सहकार क्रीडा मंडळ होते तिथे बाकीच्यांचे खो खो ची प्रॅक्टीस बघायचो. पळने वगैरे आमच्या कधीच अंगवळणी नवत तेव्हापासूनच. .किवा आंतरवर्गीय सामन्यांच्या वेळेस मी कबड्डी खेळायचो. मला आठवतय मी अ आणि ब दोन्ही वर्गांमधे थोडे थोडे वर्ष होतो पण अ, ब तुकडिमधले कबड्डी चे प्लेयर्स म्हणजे एवाढेशे छोटे छोटे पोरा होते. एका बाजूने गायके असायचा डिफेन्स ला आणि एका बाजूला मी. आधी प्रॅक्टीस मधे काही जाणवायचा नाही की आम्ही छोटे छोटे होतो म्हणून. तेव्हा आम्ही म्हणजे फार मोठे शेर असायचो पण प्रत्यक्षात जसजसे स्पर्धेत आमची टीम पुढे जायची तेव्हा समोरच्या ड, ई, फ,ग च्या टीम समोर काही सेकंद तरी मनात धडकी भरायची.  खासकरून तेव्हा राजगुरू, हत्तिहोली वगैरे पोरा म्हणजे राक्षसा सारखे वाटायचे ( ती वेगळी गोष्टय की आता आम्ही पण शरिराने त्यांना गाठलय- आता हे नका विचारू की ते बारीक झालेत की आम्ही जाड..असो) तर तेव्हा 9वी की 10वी मधे आम्ही फाइनल सुधा जिंकलेलो कबड्डीची तेव्हाचा आनंद काय वर्णावा तो सोहळाच..  हां तर विषय हा होता की शाळेने किवा शिक्षकांनी जस घडवल त्याचा परिणाम म्हणून आज हे असे सर्वासमोर आहे. लहानपणी जाणते अजाणते पनि फार न्यूनगंड होता मनात. कदाचित अ, ब अशा हुशार तुकडीमधे असल्यामुळे असेल पण जे जीवभावाचे मित्र होते त्यांनी कधीच तो जाणवू दिला नाही. तसा शाळेत सुटल्यानंतर जेव्हा पुढील शिक्षणाला बाहेर गेलो तेव्हा खरा कळाल की आपण किती तयार झालेलो आहोत ते.  दुर्दैवाने आज एकच खंत वाटते ती म्हणजे आजकालच्या शाळांमधे खेळ आणि इतर प्रकार बंद होत चालले आहेत. वैचारिक आणि सांस्कृतिक जडनघडनच जणू खूंटत चालली आहे.

योगायोगाने मधल्या सुट्टीच्या निमित्ताने शाळेत बर्‍याच वेळा जाणे येणे झाले त्यात एक दोनदा शनिवारी शाळा सुटल्या नंतर गेलेलो. मनात संमिश्र भावना होत्या एक म्हणजे शाळा सुटल्याच्या आनंदात घरी निघालेल्या मुलांच्या चेहर्यावरचे भाव टिपता आले आणि एकदम फ्लॅशबॅक मधले आमचे दिवस आठवले पण त्यानंतर ग्राउंड वर नजर फिरल्यानंतर त्या आनंदावर विरजण पडले, अक्षरशः ग्राउंड वर 2-4 पोर सुद्धहा खेळताना दिसले नाहीत. फार वाईट वाटल. दिवसें दिवस मुलांमधे मैदानी खेळ कमी होत चालले आहेत म्हणून या लेखाच्या आधारे मला नक्कीच आवाहन करावास वाटते की मित्रांनो आणि मैत्रिणिनो अजूनही वेळ गेली नाहीए आपल्या मुलांना देखील आपण ज्या पद्धतीने मैदानात खेळायचो, सगळ्या आक्टिविटी भले त्या सांस्कृतिक असो धार्मिक असो किवा आपला वारसा आपल्या जुन्या पद्धती आपल्या नवीन पिढिपर्यंत नक्की पोहोचवा. बर्‍याच जणांना वाटत की पाश्चात्य संस्कृती प्रमाणे वागाव किवा आपल्या पाल्याना इंग्लीश मीडियम तरी शिकवाव वगैरे. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मत किवा निर्णयाचा भाग आहे पण एवढा नक्की की मला गर्व आहे मी मराठी मीडियम मधे शिकलो आणि आजूबाजूला जेव्हा पाहतो तेव्हा मराठी मीडियम च्या मुलांची वैचारिक पातळी असो किवा व्यवहारातला अंडरस्टॅंडिंग असाव आपल्या बॅच ची सगळी मुलेमुलि पाहिली की जाणवत सगळे बर्‍यापैकी स्थिरस्तावरआहेत आणि चांगल्या पद्धतीने आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत.असो उगाच विषयांतर नको तर कमीत कमी आपली मुले खेळात आणि बाकी क्षेत्रात पारंगत होतील किवा कमीत कमी त्याची गोडी राहील याची काळजी घ्यावी.

या मधल्या सुट्टीच्या निमित्ताने काळाची एक दुमडलेली घडी जी कुठेतरी हरवलेली होती ती मनात हळू हळू उलगडू लागली. गेल्या काही वर्षांपासून बर्‍याच वेळा रियूनियन होणार अस कानावर येत होतं पण काही केल्या पुढची बातमी किवा पूर्तता झाली नाही आणि मन निराश व्हायच मग यावेळीही अशाच चर्चान्ना जेव्हा उधाण आले तेव्हा वाटल आता तरी हे झाला पाहिजे कारण २० वर्ष म्हणजे फार मोठा काळ होता आणि जी शाळेतल्या लहानपनीच्या मित्रांना भेटण्याची ओढ लागलीये ती कशी पूर्ण करावी यासाठी संयोजन समितीमध्ये सहभागी झालो आणि त्या भेटीला शिक्कामोर्तब केले. तसा आयुष्याचा पूर्ण आलेख पाहिला तर ही आयुष्याची मधली सुट्टीच वाटते, अर्धि वाटचाल झालीय आणि आता अर्धि बाकी आहे. पण या पुर्वाधाच्या भागात सर्वात मोठे आणि महत्वाचे योगदान जर कुणाचे असेल तर ते आहे आमच्या जीवभावाच्या शाळेतल्या मित्रांचे म्हणजेच मैत्र जीवाचे!! प्रत्येक मित्राच्या काही स्पेशल आठवणी आहेत आणि आपल्यातल्या प्रत्येकाच्याच त्या नक्कीच असतील. म्हणूनच त्या आठवणीत रममाण होऊन हे लिखायला बसलोय. तुम्ही जेव्हा हे वाचत असाल तेव्हा आपण सर्व त्या जुन्या आठवणी एक दिवसासाठी जगलेले असु आणि त्याच आठवणी उरलेल्या अर्ध्या आयुष्यसाठी मनाच्या एका कोपर्‍यात साठवून ठेवलेल्या असतील. कदाचित आपल्यातील काही लोक न येऊ शकल्याने भेट झाली नसेलही पण त्यांची आठवण नक्कीच मनात घर करून गेलेली असेल आणि जे भेटलेले असतील त्यांच्या त्या आयुष्याच्या सुवर्ण क्षणांना आठवून हृदयाच्या एका कोपर्‍यात परत एकदा जतन करून ठेवलेले असेलच. तर अशा त्या माझ्या मित्र मैत्रीणीना सप्रेम नमस्कार आणि नेहमी सगळ्यांनी एकमेकांशी संपर्कात राहावे तसेच या मधल्या सुट्टी रूपी लावलेली वात या आयुष्यरूपी दिव्यात सतत तेवत रहुदे अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आयुष्यात जर आपल्यातील कोणाला कसली मदत लागली तर आपण नक्कीच एकमेकांच्या मदतीला उभे राहू हा विश्वास घेऊन सर्व जन आपापल्या घरी जातील ही देखील खात्री आहे.
आठवणीत जयांच्या होऊन रममाण
आयुष्याच्या क्षणांचा होऊन सोबती
पांढरा शर्ट आणि निळ्या पॅंटच्या गणवेषात
जीवनाच्या शाळेचे सवंगडी
हसत खेळत रमत गमत गेले ते दिवस
खरोखर देत असत जिवाला जीव
मित्र नसे ते साधे सुधे
होते ते जीवभावाचे... मैत्र जीवांचे!!!

-- RAVSAHEB

Tuesday, December 13, 2016

स्पंदने मनाची..!!! 


स्पंदने मनाची कसा ठाव घेती
भावना तयाच्या  मर्मबंध जपती
रिक्त वाटे सार्‍या रीतीभाती
प्रेमाच्या आशेने जळणारी नाती
रागलोभ प्रेमप्रीत वासना त्या किती
सप्तरंगी नाहण्या ओंजळ करती
स्पंदने मनाची रुणझुण करती
भिरभिरत्या पाखरांसम किलबिल करती
अंतरंग निर्मळ परी तेजोमय कांती
मत्सर मिसळून तया गढूळ त्या होती
स्पंदने मनाची किती आक्रोश करती
मनुधर्म सोडण्याची वाटते भिती
सद्बुद्धी आतल्या जाग्रुत होती
विचारांच्या वादळात लवलवती पणती
स्पंदने मनाची अनुभवे क्रांती
द्वंद्व  अंतर्मनातले अवती नि  भोवती
स्पंदने मनाची कसा ठाव घेती
दुर्विचारांच्या किती अंतर्गत मौती
जगण्याच्या रोज नव्या अनुभूती
स्पंदने मनाची.....


Monday, January 30, 2012

अन्जानी राहोपे....!!!

अन्जानी राहोपे कांटे भी  थे और फुल भी 
पत्थर भी थे और बेहद  डरावने भी 
कुच ख्वाबोन्के इशारे भी थे 
और कुच  दिलकश नजारे भी थे 
जाने किन हालातो  पे निर्भर होगा ये सफर 
हर मंझील अलग और मुश्कील हर डगर 
अजीब कश्मकश मे डुबे शामो सहर
ना मिली राहे तो भटके दर बदर 
क्या हर इन्सान को राह मिलनी जरुरी है? 
क्या हर इन्सान को ठोकर खानी जरुरी है ?
खुदाकी आज़माइश का  भी कोई जवाब नही
यहा  हर राही मंजिल से क्यू  दूर है?
शायद यही तो दुनिया का दस्तूर है 
जिसको मिलती मंजिल वो बेखबर  है 
नेकी कि मिलती नही कोई भी मिसाल अब 
 क्युंकी बेरुखी हि सबसे ज्यादा जरूर है 
अन्जानी राहे क्या कभी होगी जानी पहचानी  ?
क्या कभी खुशिया हमारी राहो  मे है आनी ?
अब तो बस जिंदगी यु  हि है सतानी
अन्जानी राहोपे....





Thursday, August 4, 2011

Zinda ho TUM????????

Dilonme corruption sahne ki takat hai to Zinda ho tum...
Dilonme roj ke attack sahne ki himmat hai to Zinda ho tum..
roj ki bambari ke baad bhi dar darke wapis wapis raste pe aao..
To zinda ho tum...
labonpe mahangai ki takrar hai to zinda ho tum..
facebook aur tweeter pe deshbhakti dikhao to zinda ho tum...
bhala desh ki halat chahiye jitni bekar hai..zinda to ho tum...
Desh ki halat sudharanaa..sirf vichar hai aur kaho zinda ho tum..
khudke mulk me chahe jitne lachar hai.. lekin zinda to fir bhi ho tum..
sabse bada to sala yaha brashtachar hai tabhi bhi zinda ho tum..
Anna Hajare ki bhuli hui lalkar hai...to zinda ho tum
aawaj uthane wale pe lathichar hai to zinda ho tum..
har chij pe rote bar bar hai aur zinda ho tum..
khudpe rou ya hasu pata nahi chale to zinda ho tum..
bhala ho ghar me hi lutmar to zinda ho tum....
huh!!! kya sach much me Zinda ho TUM???????? 

Wednesday, August 3, 2011

क्षण गहिरे ....!!!!

क्षण गहिरे आसुसलेले 
प्रेमाच्या थेम्बांसाठी 
मन काही हिरमुसलेले 
अनदेख्या स्वप्नांसाठी 
दिस होते ते मंतरलेले 
आनंदाच्या आशेपोटी 
आठवणी कुरतडलेल्या 
मित्रांच्या अवती भोवती 
उगाचच भांडलेल्या
आपल्याच जीव्हाल्यापोटी
रोज रोज त्रासलेल्या 
जागून अभ्यासासाठी 
योजना त्या आखलेल्या 
काहीतरी बनण्यासाठी 
क्षण सगळे ते आता धूसर 
आठवणी कुजलेल्या 
जिव्हाळा टिकवून ठेवला 
मात्र अंतर थोडेसे वाढलेले 
क्षण ते सगळे जपलेले 
रोज मनात दाटण्यासाठी
क्षण गहिरे ....!!!!