Thursday, July 8, 2010

मन....!!

मन बेभान बेभान
मन बेभान बेभान
मन उधाण उधाण
मन भयाण भयाण
मन आहे खूप मोठे
मन लहान लहान
आयुष्याच्या उन्हामधे
मन तहान तहान
लाख गरजा तयाच्या
त्याची वाढते तहान
भावना किती तयाच्या
क्षुद्र असो वा पावन
प्रत्येक मनामध्ये असतो
लपलेला एक रावण
जोपसता तयाला
करू लागे ते भ्रमण
छोट्याशाही आशेपोटी
करी शेकडो स्पंदन
नाही कशाचेही तयाला
छोटेशेही बंधन
मन तुफान तुफान
मन बेभान बेभान....

Friday, July 2, 2010

कदाचित.....!!!!

कदाचित सगळ मनासारख होतहि असावॅ
कदाचित सगळ चांगला देखील होत असावॅ
मनाला काही जाणीव व्हायला लागलीय
पण मनात काय आहे ते समजत नाहीय
मनातला काळोख काही केल्या दूर होत नाहीये
कालोखात प्रकाश कुठे तरी घुटमलतोय
झीन-झिण्या येतात विचार केल्यावर
डोक्यात एक विचित्र सनक भर्तिये
कदाचित अबोल आहे सगल काही
कदाचित मोल नाही कशाचेही
कदाचित विचारांची जोड हविये
कदाचित विकारांवर तोड हविये
असन्ख्य भावना दाटून आल्यात
असन्ख्य कल्पना जाग्या झाल्यात
वाटत होत निर्विकार सगळा
पण अलन्कारिकच होत सगळा
वास्तवाची जाणीव हरवलीये
कदाचित.....!!!!