Friday, September 24, 2010

kalpavruksha

ही कविता स्नेहा आणि मी २१ अप्रैल २००७ मधे दोघांनी मिळून लिहिलेली॥

तुम्ही नेहमीच कल्पवृक्षा परी उभे राहिलात माझ्या पाठीशी
काही मागायाच्या आतच सगळ मिळत गेल
तुमची शिस्त तुमच रागावन ... तुमचा दरारा ..
तुमच्या प्रेमाचा झरा
सगळ आठवतय...तुमच्या पासून दूर जाताना
तुम्ही आभाल होउन बरसात राहिलात ....
कधी सावलीही झालात
खुप काही दिलत न मागता ...
खरच तुम्ही नेहमीच कल्पवृक्षा परी उभे राहिलात माझ्या पाठीशी ...
खुप काही केलत तुम्ही काबाड कष्ट
गोष्टितल्या बाबांसारखे नसले.. तरी खुप
पण आठवतो तो तुमचा हसरा चेहरा ..
अन जवळ घेउन मारलेली पाठिवराची थाप
कधी गर्द झाडितली एक पाउलवाट वाटलात
तर कधी अन्धारया आयुष्यातला प्रकाश झालात ..
खरच तुम्ही नेहमीच कल्पवृक्षा परी उभे राहिलात माझ्या पाठीशी .
बोट धरून चालायला शिकवणारे तुम्हीच होता
पडलो तर उचलनारे हात तुमचेच होते ...
आता मोठा झालो मी.. चालायलाही येतच
पण कधी पडलोच तर तुमचे हात
सदैव माझ्या साठी असू देत
माझ्या या कल्पवृक्शाला उदंड आयुष्य लाभु देत ...