सुख दुक्खाच्या लाटेवर जीवन जणू एक सागर
मंतरलेल्या आयुष्यात मी स्वप्नश्रुष्टिचा सौदागर
रहस्यमयी हे जीवन सगले असे नात्यांचा गुंता
थोडा आनंद , थोडा वैताग असते सतत चिंता
वेगले तयाचे गणित दमलो भागता गुणता
कोण आपले कोण परके अन कुठली निरर्थक जनता
बारे वाटते स्वप्नच जादा नको आयुष्याचा जागर
मंतरलेल्या आयुष्यात मी स्वप्नश्रुष्टिचा सौदागर
शहान्यापरी वेडेच बरे असे कित्येकदा वाटे
मैत्रीच्या आशेत मनाला शत्रूच ज्यादा भेटे
लिहून पाहिली लाख आयुष्यावर आनंदाची गीते
घड़ा त्रासाचा भरतो जास्त अन सुख नेहमी रीते
स्वप्नामद्धे बहरलेला असतो हर एक मंजर
मंतरलेल्या आयुष्यात मी स्वप्नश्रुष्टिचा सौदागर
हवे नको ते मीच ठरवतो
मलाही तेथे मीच भुलवतो
सोन्याच्या राशिंचा तेथे मी बांधतो डोंगर
मंतरलेल्या आयुष्यात मी स्वप्नश्रुष्टिचा सौदागर
हिरवल्लेल्या रानामधे आनंदाची झाडे
सुबलता मुबलक अन मोठी तयांची खोडे
इंद्रधनूच्या रंगांपरी रंगीबेरंगी दुनिया
स्वप्नाच्या देशाची जणू हीच मोठी किमया
चंदेरी स्वप्नांना मिलते अद्भुतशी झालर