कोण्या एके संध्याकाळी मनात माझ्या आले काही...
कल्पनांच्या जगात जगणे आता बिलकुल शक्य नाही...
दिसत नाही गुलाबी संध्या नाही शीतल छाया...
वाटू लागली आहे मजला सगळी मोहमाया... ॥
स्वप्न असे की सत्य जणू धूसर सगळी दुनिया...
भल्या भल्यांच्या आयुष्याची होउन बसलिय किमया...
कोण आपला कोण परका पाहून उमगत नाही ..
सद सदविवेक बुद्धि देखिल गेली पूर्ण वाया...
वाटू लागली आहे मजला सगळी मोहमाया... ॥
दीपावलीच्या फताक्यंगत रासरोज उडतो दारुगोला...
अन पाचोल्यागत माणूस देखिल होतोय चोलामोला...
शिक्षणाचा बाजार झालाय पैसा सगळ्यात मोठा...
विद्वत्तेचा उपयोग नाही पैसे फ़क्त लोटा...
माणुसकी गायब झालिये जणू आम्ब्यातुन कोया...
वाटू लागली आहे मजला सगळी मोहमाया... ॥
कामापुरता मामा आणि काट्याने काटा...
मूलमंत्र हाच असे आणि लाजिरावान्या वाटा ...
मनामनातुन फुटू लागल्या दुक्खाच्या लाटा...
नितिमत्तेचे रक्तरंजित पाझर फुटले ...
कृत्रिमतेच्या लागु लागल्या झलाया...
वाटू लागली आहे मजला सगळी मोहमाया... ॥
4 comments:
hye ams kay re baba moha maya vagare nice one ani kiti heavy shabda takto yar tu
mast jamaliy re......
Kupach chan brother...!!!
Tula he sagala suchata kasa re...:)
thanks guys... i know even i felt the same... and my reaction was dont know if others will like it or not..but mast vatatey mala :)
Post a Comment