क्षण गहिरे आसुसलेले
प्रेमाच्या थेम्बांसाठी
मन काही हिरमुसलेले
अनदेख्या स्वप्नांसाठी
दिस होते ते मंतरलेले
आनंदाच्या आशेपोटी
आठवणी कुरतडलेल्या
मित्रांच्या अवती भोवती
उगाचच भांडलेल्या
आपल्याच जीव्हाल्यापोटी
रोज रोज त्रासलेल्या
जागून अभ्यासासाठी
योजना त्या आखलेल्या
काहीतरी बनण्यासाठी
क्षण सगळे ते आता धूसर
आठवणी कुजलेल्या
जिव्हाळा टिकवून ठेवला
मात्र अंतर थोडेसे वाढलेले
क्षण ते सगळे जपलेले
रोज मनात दाटण्यासाठी
क्षण गहिरे ....!!!!
No comments:
Post a Comment