Saturday, February 19, 2011

विक्षिप्त !!! - मंथन

लख लखनाऱ्या वीजा आनी चम् चमनाऱ्या चांदण्या
अकल्पित जीवन अचानक डोक्यात झिन झिन्या
काव काव कावले नि चिव चिव चिमण्या
रहातात कोठे आनी का मनात माझ्या पाहुण्या ?
आज करवेना माझाच मला सामना
उथल खोल खोल गहीरया भावना
उगाचच होनारया संवेदना ||
झूल झूल वारा नि खल खल पानी
निसर्ग गातोय गाणी
वास्तव असे की स्वप्न लोचनी
भग्न मन संथ विचार अन चिम्ब वाणी
स्वच्छ सुन्दर मनात शांतता तूफानी ||
उंच उंच पर्वतरांगा आनी छोटी त्यांची कलसे
सरल सरल रस्त्याला देखिल घालतोय वलसे
भूते देखिल वाटू लागली माणसे
आनी माणसे किड्लेली कनसे ||
वख वखनार्या नजरा आनी मोगरयाचा गजरा
सुगन्धित फुलांचा घानेरडा वास अन सुखातला त्रास
दुख्हाची रास अन अगम्य आभास
नितल हवेत घुटनारा श्वास
सुमधुर संगीतात कर्कश्य आवाज ||
गर गर गिरक्या अन सर सर वारा
सहारयाला धरून बुडनारा की बुडून वाचनारा
जीवन मृत्यूचा खेल की खेलात जीवन मृत्य
सखोल पठार की पसरट दरी, वर ख़ाली की खाली वरी
संतप्त मनाची विक्षिप्त शांतता की शांत मनाचा संताप
आयुष्याचा खेल कधी कसा उमगनार
आयुष्य सुन्दर आहे ? त्याला अजुन सुन्दर बनवणार ?

2 comments:

Unknown said...

ek shabdeek khel!

RAVSAHEB said...

shabdik khel ki khelatale shabda? :P