मन बेभान बेभान
मन बेभान बेभान
मन उधाण उधाण
मन भयाण भयाण
मन आहे खूप मोठे
मन लहान लहान
आयुष्याच्या उन्हामधे
मन तहान तहान
लाख गरजा तयाच्या
त्याची वाढते तहान
भावना किती तयाच्या
क्षुद्र असो वा पावन
प्रत्येक मनामध्ये असतो
लपलेला एक रावण
जोपसता तयाला
करू लागे ते भ्रमण
छोट्याशाही आशेपोटी
करी शेकडो स्पंदन
नाही कशाचेही तयाला
छोटेशेही बंधन
मन तुफान तुफान
मन बेभान बेभान....
1 comment:
mann bedhunda bedhunda vichara mage hye
shabdana mandate aushya jagun...
Post a Comment